Tuesday, January 25, 2022
No menu items!
HomeUncategorizedयंदा दिवाळी नव्हे दिवाळं निघणार ,बीडमध्ये पेट्रोल 114 रु. 85 पैशे, डिझेल...

यंदा दिवाळी नव्हे दिवाळं निघणार ,बीडमध्ये पेट्रोल 114 रु. 85 पैशे, डिझेल 105 तर पॉवर पेट्रोल 118 रुपयांवर

पेट्रोल-डिझेलची विक्रमी दरवाढ,
‘पेट्रोल के दाम कम हुए की नही’ म्हणत टिर्‍या बडवून घेणारे अन् दाद देत टाळ्या वाजवणारेही गप्प
बीड (रिपोर्टर)- 2014 च्या अभूतपुर्व विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातील तिथल्या जाहीर सभांमधून ‘पेट्रोल के दाम कम हुए की नही’ असं म्हणत स्वस्त इंधनाचे श्रेय घेत ‘मोदी नसिबवाला है’ म्हणत ‘आप नसिबवाले के पिछे जाएंगे या कम नसिबो वालो के पिछे’ असा जाहीर सवाल विचारत मात्र त्यानंतर गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले असून आज पुन्हा पेट्रोल 31 ते 35 पैशाने आणि डिझेल 33 ते 37 पैशाने वाढल्याने इंधन दरवाढीत अभुतपूर्व वाढ झाली असून पेट्रोल 113 रु. 27 पैशे, पॉवर पेट्रोल 116  रु. 95 पैसे, डिझेल 104 रु. 75 पैशे मुंबईत झाले आहे तर बीडमध्ये पेट्रोल 114 रु. 85 पैशे, पॉवर पेट्रोल 118 रुपये, डिझेल 105 रुपये वर जाऊन पोहचले आहे. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांची दिवाळी नाहीतर दिवाळं निघणार आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांची कंबरमोड होताना सरकारच्या या दांडकशाहीविरोधात आवाज उठवायला कुठलाही पक्ष ताकतीने समोर येत नसल्याने ‘हमाम मे सब नंगे’ असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त केली जात आहे.
    कच्च्या तेलाचे भाव वाढत चालल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याचे सांगण्यात येते. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे भारतातील पंपाच्या किंमतीत प्रति डॉलर 84 उच्चांकावर जाऊन पोहचला आहे. दुसरीकडे गेल्या दोन वर्षांपुर्वी याच बॅरलची किंमत नगन्य 5 ते 3 डॉलरवर येऊन पोहचली होती. तेव्हाही पेट्रोल आणि डिझेल 70 आणि 80 च्या घरात भारतात विकले जात होते. 2014 च्या कालखंडात भारतीय जनता पार्टीला अभुतपूर्व यश आले आणि 2015 च्या मार्च-एप्रिलपर्यंत पेट्रोलचे भाव प्रचंड कोसळले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी छातीठोकपणे ‘मै नसिबवाला हुँ’ म्हणत श्रेय घेत होते. मात्र त्यानंतर केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलवर कर लावले. राज्य सरकारांनीही आपआपल्या पद्धतीने कर लावले त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव आज गगनाला भिडले. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये 30 पैशापेक्षा जास्त पैशाने वाढ होत आहे. त्यामुळे आज झालेल्या वाढीमध्ये मुंबईत पेट्रोल 113 रु. 80 पैशे तर डिझेल 104 रु. 75 पैशे प्रतिलिटरने विकले जात आहे. बीडमध्ये पेट्रोलचा दर 114 रु. 85 पैशे तर डिझेलचा दर 105 रु. , पॉवर पेट्रोल 118 रुपये  झाला आहे. या इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून या दरवाढीचा फटका अन्य साधनांना बसत आहे. तिथे प्रचंड भाववाढ होताना पहावयास मिळते. इंधन दरवाढीमुळेच सर्वसामान्यांची लालपरी असलेली एसटी बसचे भाडेही तब्बल 17 टक्क्याने वाढले आहे. या दरवाढीच्या आणि महागाईच्या भस्मासुरुरामुळे यंदा सर्वसामान्यांची दिवाळी नव्हे तर दिवाळं निघणार  हे आता स्पष्ट दिसून येत आहे. देशात महागाईचा भस्मासूर आ वासून उभा असताना केंद्र सरकार लोकांच्या खिशातून पैशे काढण्यात मग्न आहे.

Most Popular

error: Content is protected !!