Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमबीडमध्ये बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा बॉबी संतरा, टँगो प्रिमियम, भिंगरी संतरा,...

बीडमध्ये बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा बॉबी संतरा, टँगो प्रिमियम, भिंगरी संतरा, रॉकेट देशी दारूचे होत होते उत्पादन एक कोटीचा मुद्देमाल जप्त


बीड (रिपोर्टर)- बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या बहीरवाडी शिवारात आज दुपारी बारा वाजता दारू बंदी विभागासह बीड ग्रामीण पोलिसांनी गोडाऊनवर छापा मारला असता धक्कादायक बाब समोर आली असून या गोडाऊनमध्ये बनावट देशी दारूचे उत्पादन करण्यात येत होते. बॉबी संतरा, टँगो प्रिमियम, भिंगरी संतरा, रॉकेट देशी दारूचे चार ब्रँड या ठिकाणी उत्पादीत करण्यात येत होते. पोलिसांना आणि दारूबंदी विभागाला या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर लेबल, रिकाम्या बाटल्या, कार्टून, भरलेल्या बाटल्या, बाटल्या सील करण्याची मशीन यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे सर्व साहित्य घरात आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून घटनास्थळावरून आरोपी फरार झाले आहेत. सदरचा कारखाना हा रोहीत चव्हाण याचा असून यापुर्वीही त्याच्यावर कारवाई झालेली आहे.


याबाबत अधिक असे की, बीड जिल्ह्यामध्ये बनावट देशी दारूचे उत्पादन होत असल्याची माहिती दारूबंदी विभागाला झाली होती. आपल्या खबर्‍यामार्फत दारूबंदी विभागाचे पोलीस अधिक्षक नितीन घुले यांनी आणि बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे एपीआय योगेश उबाळे, पीएसआय पवरकुमार राजपुत यांनी सर्व माहिती काढून आज सकाळी बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या बहीरवाडी शिवारात मिनी बायपास जवळ एका गोडाऊनवर संयुक्त छापा मारला. गोडाऊनमध्ये घुसताच घटनास्थळावरून आरोपी पसार झाले. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट देशी दारूचे साहित्य मिळून आले. प्राप्त माहितीनुसार हा गोडाऊन एकप्रकारे बनावट दारू बनवण्याचा कारखाना होता. हा कारखाना रोहीत चव्हाण याचा असून त्याने केशव गायकवाड यांच्याकडून सदरची जागा किरायाणे घेतलेली आहे. सहा महिन्यापुर्वीही पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोहीतचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला होता. या ठिकाणी बॉबी संतरा, टँगो प्रिमियम, भिंगरी संतरा, रॉकेट देशी दारूचे बनावट पद्धतीने सर्रास उत्पादन होत होते. गोडाऊनचा आवाका पाहता आणि जप्त केलेला कच्चा आणि बनलेला माल पाहता या ठिकाणावर रोज हजारो बाटल्या बनावट दारुचे उत्पादन होत असल्याचे दिसून आले. दारूबंदी विभागासह बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावरून बनावट दारू आणि त्याचे साहित्य, लेबल, पॅकिंग मशीन असा एकूण १ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई दारूबंदी विभागाचे पोलीस अधिक्षक नितीन घुले, बीड ग्रामीणचे एपीआय योगेश उबाळे, पीएसआय पवनकुमार राजपूत, वाघमारे, अंकुश वरपे, रविंद्र जाधव यांच्याहस पीएसआय नाईकवाडे, घोरपडे, शेळके, खाडे, मोरे, पाटील, सांगोळे, गोणारे, लोमटे, मस्के, जारवाल यांनी केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!