Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमVideo-शहागड मध्ये दिवसाढवळ्या बुलठाणा अर्बन बँकेवर दरोडा

Video-शहागड मध्ये दिवसाढवळ्या बुलठाणा अर्बन बँकेवर दरोडा

शहागड – ऑनलाईन रिपोर्टर 

जालना जिल्ह्यातील शहागड येथील बुलडाणा अर्बन बँकेच्या शाखेवर गुरुवारी पावने पाचच्या सुमारास फिल्मी स्टाईल दरोडा पडला आहे. पिस्तूल असलेल्या तीन दरोडेखोरांनी 25 लाखांची रोख रक्कम व जावळपास 70 लाख रुपयांचे सोने पळवले.

हा प्रकार घडला तेव्हा बँकेत दोन क्लर्क, दोन कँशिअर, दोन शिपाई, एक मॅनेजर हजर होते. बंदुकीचा धाक दाखवून तिघे बँकेत आले. नंतर बँकेतील सर्वांना बंदुकिचा धाक दाखवून एका जागेवर बसवले. यावेळी शाखाप्रमुख गणेश खापरे, निखिल जावळे क्लर्क, कॅशिअर विकास बांग, सोने तारणचे इंगळे हे कर्मचारी उपस्थित होते. दरोडेखोर कॕशीअर प्रमोद पुंडे यांना लॉकरकडे घेऊन गेले.व रोख रक्कम 25 लाख रूपये व सोने तीन लाॉकरमधून अंदाजे 70 लाखांचे सोने घेऊन पळाले. दरोडेखोर विनाक्रमांकाच्या दूचाकीवरुन आले होते.

घटनेची माहिती शाखाव्यवस्थापक खापरे यांनी पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांना घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. शहागड पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळासे घटनास्थळी आले होते. घटनेनंतर पोलिसांनी जवळपास रोडवर माग काढण्याचा प्रयत्न केला.या दरोड्यामध्ये अंदाजे 25 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 70 लाख रुपयांचे सोने दरोडेखोरांनी पळवण्याचे कळते आहे. मात्र नेमका किती मुद्देमाल गेला. याचे ऑडिट करण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक विनायक देशमुख अप्पर पोलिस अधीक्षक विक्रम देशमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजबळ यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

Most Popular

error: Content is protected !!