Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडराष्ट्रीय पेन्शन योजना राबवण्यासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन महसूल, जिल्हा परिषद, ग्रामसेवक संघटना...

राष्ट्रीय पेन्शन योजना राबवण्यासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन महसूल, जिल्हा परिषद, ग्रामसेवक संघटना सहभागी


बीड (रिपोर्टर)- राज्य सरकारने 1 नोव्हेंबर 2005 पासून परिभाषित अंशदान योजना राज्य कर्मचार्‍यांना लागू केली आहे तर 2015 पासून याचे रुपांतर राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये करण्यात आले आहे. या दोन्ही पेन्शन योजना महसूल आणि सर्व कर्मचार्‍यांचा विरोध आहे. गेल्या 16 वर्षांपासून राष्ट्रीय पेन्शन योजनेत जे कर्मचारी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये ते आणि त्यांचे कर्मचारी भरडले जात आहेत. त्यामुळे ही राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करावी या मागणीसाठी आज महसूल सोबतच सर्व कर्मचारी संघटनांनी ठिय्या आंदोलन करत आपल्या माण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

निवेदनात त्यांनी देशभरातील राज्यांनी केंद्र सरकारला जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. केंद्र कर्मचार्‍यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करावी पण त्या अनुषंगाने सर्व लाभ कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय, निवृत्ती वेतन, ग्रॅच्युटी लागू कराव्यात, राज्य सरकारी कर्मचार्‍यांना 10 टक्के शासन अंशदानाऐवजी सुधारीत 14 टक्के अंशदान रकमेची वजाबाकी करून आयकरासाठी एकूण उत्पादनातून अनुज्ञेय करावी, पुर्वीच्या सेवेचा राजीनामा देऊन नवीन सेवेत समाविष्ट झालेल्या कर्मचार्‍यांना ही योजना लागू करावी, यासाठी राज्यातील सर्व कर्मचारी संघटनांनी आज ठिय्या आंदोलन करत जिल्हाधिकार्‍यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनावर महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय आंधळे, सरचिटणीस नितीन जाधव, उपाध्यक्ष हर्षद तांबडे, बालाजी कचरे, संजय चव्हाण, शंकर बुरांडे, नामदेव खेडकर, श्रीनिवास मुळे, महिला प्रतिनिधी श्रीमती वैशाली जाधव, उर्मिला मिसाळ, हेमलता परचाकरे, अर्चना डोळे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सचिव रामेश्वर घाडगे, उपाध्यक्ष स्वप्नाली पवार, राहुल वीर आदी कर्मचार्‍यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!