Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमऊसतोड कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या पाच दिवसात तीन शेतकर्‍यांनी संपविले जीवन

ऊसतोड कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या पाच दिवसात तीन शेतकर्‍यांनी संपविले जीवन


परभणी तांड्यावर रात्री घडली घटना
वडवणी (रिपोर्टर):- शेतातील सततची नापिकी आणि कर्जाचा डोंगर या विवंचनेतून 5 दिवसात 3 शेतर्‍यांयांनी आत्महत्या केल्या असतानाच आज पुन्हा शेतकरी पुत्राने स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.सदरील घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून आत्महत्येचं सत्र थांबता थांबत नसल्याच चित्र दिसून येत आहे.


वडवणी तालुक्यातील परभणी तांडा येथील रहिवाशी आसणारे संदिपान रामा चव्हाण (वय-45 वर्ष) अस मयत शेतकरी पुत्राच नाव आहे.तर वडिलांना अवघी दिड एकर जमिन ती हि कोरडवाहू.सदरील मयत शेतात काम करुन सहा महिने उस तोडणीचे काम करुन कुंटुबाचा प्रंपच करत होते.यांना दोन मुली तर दोन मुले आहेत.एका मुलीचा विवाह झाला आहे.एक मुलगी आविवाहित असून सदरील शेतकरी पुत्राची अंत्यत गरीब परस्थिती आहे असे सांगण्यात आले असून ते शेतातच वास्तव्यास होते.रात्री जेवण करुन थोडे फिरुन येतो असे संदिपान चव्हाण घरच्या मंडळीना म्हणाले आणि आवघ्या काही अंतरावर असणाऱ्या स्वताच्याच शेतातील लिंबाच्या झाडाला दाव्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.या घटनेन पुन्हा खळबळ झाली असून नऊ दिवसातील हि चौथी घटना समोर आली आहे.असून यंदा मयताने कर्नाटक राज्यातील एका कारखान्याची उचल सुध्दा घेतलेली आसून या दोन चार दिवसात कारखान्याला जाणार होते.असे सांगण्यात येत आसून हा आत्महत्या करण्याचे नैराश्य का आले असावे.असा प्रत्येकाला पडला आहे.

कुंटुबाला आर्थिक मदत द्या – बद्रीनाथ व्हरकटे
वडवणी तालुक्यात आज पर्यत तीन शेतकऱ्यांनी नैराश्य पायी आत्महत्या केल्या आहेत.परंतु रात्री संदिपान रामा चव्हाण या शेतकरी पुत्राने देखील आत्महत्या केली असुन हे कुंटुब अंत्यत कष्टाळू आणि गरीब होते.शेती करत ऊसतोडणीचे काम करुन उपजिविका भागवत होते.यात एक मुलगी अविवहित असुन या कुंटुबाला शासनाने शासनस्तरावर मदत करावी अशी मागणी ढोरवाडीचे सरपंच बद्रीनाथ व्हरकटे यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!