Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडपीक विम्यासाठी सिरसाळा ते बीड शेतकर्‍यांची संघर्ष दिंडी

पीक विम्यासाठी सिरसाळा ते बीड शेतकर्‍यांची संघर्ष दिंडी


1 नोव्हेंबरला दिंडी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
आंदोलनात महिलांचा सहभाग
ऐंशी कि.मी.पार करून दिंडी बीडला येणार

परळी (रिपोर्टर)- 2020 साली पीक विमा कंपनीने शेतकर्‍यांकडून विमा भरून घेतला त्यावर्षी शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र कंपनीने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली नाही, नुकसान भरपाई देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी किसान सभेच्या वतीने आजपासून सिरसाळा येथून संघर्ष दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये शेकडो शेतकर्‍यांचा सहभाग असून 1 नोव्हेंबर रोजी दिंडी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. दिंडी बीडकडे कुच करत असताना या दिंडीत शेतकर्‍यांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे.


पीक विमा कंपन्या शेतकर्‍यांकडून विमा भरून घेतात मात्र शेतकर्‍यांना तितक्या प्रमाणात नुकसानभरपाई देत नाही. 2020 साली खरीपाचा विमा भरण्यात आला होता त्या साली खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान होऊनही शेतकर्‍यांना विम्याचा लाभ मिळाला नाही. विम्या संदर्भात अनेक वेळा आवाज उठवण्यात आला. मात्र याची दखल प्रशासकीय पातळीवर आणि विमा कंपनीकडून घेण्यात आली नाही. विमा कंपनीला ताळ्यावर आणण्यासाठी किसान सभेच्या वतीने सिरसाळा येथून आज संघर्ष दिंडी काढण्यात आली. ही दिंडी 1 नोव्हेंबर रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकणार आहे. दिंडीत शेकडो शेतकर्‍यांचा सहभाग असून रस्त्याने दिंडीमध्ये अनेक शेतकरी सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. या दिंडीमध्ये कॉ. अजय बुरांडे, कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठोड, मुरलीधर नागरगोजे, कॉ. मोहन लांब, कॉ. रुस्तुम माने यांंच्यासह आदींचा सहभाग आहे. दरम्यान या आंदोलनामध्ये महिलाही किसान सभेचा लाल झेंडा हाती घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Most Popular

error: Content is protected !!