Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeदेश विदेशज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन

मुंबई (रिपोर्टर)-बॉलिवूड-मधील ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन झाले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर त्यांचे निधन झाल्याची बातमी दिली. हंसल मेहता यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत हळहळ व्यक्त केली. युसूफ हुसैन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात, मालिकेत काम केले आहे. ‘दिल चाहता है’, ‘ओह माय गॉड’, ‘दबंग ३’, ‘धूम’ यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका निभावली. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. मी शाहिद या चित्रपटाचे २ शेड्युल पूर्ण केले होते. पण काही कारणामुळे मी अडकलो होतो. मी अडचणीत सापडलो होतो. चित्रपट निर्माता म्हणून माझी कारकीर्द संपत आली होती. त्याचवेळी ते (युसूफ हुसैन) माझ्याजवळ आले. त्यांनी मला सांगितले की माझ्याकडे एक फिक्स्ड डिपॉझिट आहे. मला त्याचा काहीही उपयोग नाही. तू जर अडचणीत असशील तरअसे सांगतच त्यांनी एका चेकवर सही केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!