Friday, January 28, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबई‘मन्नत पुरी’ आर्यन तुरुंगाबहेर

‘मन्नत पुरी’ आर्यन तुरुंगाबहेर


मुंबई (रिपोर्टर)- मुंबई ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला आणखी एक रात्र मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. मात्र, शनिवारी तो तुरुंगातून बाहेर आला.

न्यायालयाचा आदेश प्राप्त करण्यासाठी आर्थर रोड कारागृहातील बेल बॉक्स आज पहाटे ५.३० वाजता उघडण्यात आला. आर्यनला नेण्यासाठी शाहरुख खान जेलबाहेर उपस्थित होता. त्यानंतर शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास तुरुंग अधिकार्‍यांनी आर्थर रोड कारागृहाबाहेर जामीन पेटी उघडली. काल आर्यन खानच्या जामीन सुटण्याच्या आदेशाची प्रतदेखील जामीन पेटीत ठेवण्यात आली होती. त्यानंतर आर्यन खानची आर्थर रोड तुरुंगातून आज सकाळी १० वाजता सुटका होण्याची शक्यता आहे असे तुरुंग अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!