केज (रिपेार्टर)ः- महामार्गावर असलेली लाईट अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. वीज सुरू करण्यास एवढी दिरंगाई का असा प्रश्न उपस्थित करत केज विकास संघर्ष समितीच्यावतीने आज सकाळी केजळी नदीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. सदरील या आदंोलनात अनेकांचा सहभाग होता.
खाजगी कंपनीच्यावतीने महामार्गावरील लाईट बसवण्याचे काम करण्यात आले. मात्र हे काम अद्यापही पुर्ण झालेले नाही. विजे अभावी रात्री अपरात्री नागरीकांना त्रासाला सामोरे जावे लागते. इतका खर्च करुनही महामार्गावरील स्ट्रिट लाईट सुरू का होत नाही. ते तात्काळ सुरू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज केज विकास संघर्ष समितीच्यावतीने हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली केजळी नदीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील काही वेळ ठप्प झाली होती. आपल्या मागणीचे निवेदन प्रशासकीय अधिकार्यांकडे देण्यात आले आहे.