Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमफडातून ऊस नेणार्‍या ट्रॅक्टरखाली मजूराची मुलगी चिरडली

फडातून ऊस नेणार्‍या ट्रॅक्टरखाली मजूराची मुलगी चिरडली


कर्नाटक राज्यातील घटना, देवगांवच्या उसतोड मजूराची मुलगी
वाहन मालकांची दडपशाही

वडवणी (रिपोर्टर):-
उसाच्या फडात ट्रॅक्टर भरल्यानंतर ते मागे घेतांना टायरखाली चिरडून एका चार वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कर्नाटक राज्यात २८ आँक्टोंबर रोजी घडली.वडवणी तालुक्यातील देवगांव येथील उतोड मजूर आपल्या चिमुकलीला घेवून नुकतेच कर्नाटकला उसतोडणीसाठी गेले होते.
प्रेरणा किशोर कारके (वय चार वर्षे) असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. किशोर हनुमंत कारके हे उसतोड कामगार आहेत. ते १८ आँक्टोंबर २०२१ रोजी कारखान्याला गेले होते. दि. २८ आँक्टोंबर २०२१ रोजी ट्रँक्टर (क्र. एम.एच. ०९ सी.जे. ८९०७) उसाच्या फडात भरल्यानंतर ते मागे घेतांना प्रेरणा हिला ट्रॅक्टरने चिरडल्याने दुदैवी मृत्यू झाला. याबाबतचा गुन्हा नोंद होवू नये म्हणून वाहन मालकांनीच अरेराव भाषेचा वापरत मयत मुलिचे आजोबा गणेश विठ्ठलराव कसाब व आजी यांना दडपशाही करत घटनेच्या ठिकाणाहून गांवाकडे हकलून दिले. वडवणी आणि बीड येथील समाजिक स्तरावरील शिष्टमंडळ उद्या कारखान्याची भेट घेऊन झालेल्या अन्यायाची आणि घटनेची माहिती देणार आहेत. ही घटना कर्नाटक राज्यातील हिमरस या कारखान्या अंतर्गत तैराना (ता. संकेसर जि.बेलगांव) येथे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

ऊसतोड मजुरांच्या मुलांचे स्थलांतर थांबविण्यासाठी
जिल्हा प्रशासन अपयशी

सर्व्हे करून कारखाना आणि मुकदमांवर दंडात्मक कारवाई करावी. कारखाण्याला गेलेल्या मुलांना परत शाळेच्या प्रवाहात आणावे. पालकमंत्री धनंजय मुंडेंची ऊसतोड मजुरांच्या पाल्याप्रती तळमळ आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा कुचकामी आहे, वेळकाढू आहे. त्यामुळे अनेक ऊसतोड मजुरांनी पाल्याना सोबत नेले. जिल्ह्यातील वसतिगृह तात्काळ सुरू करून विध्यार्थ्यांची सोय करावी. आठ दिवसात प्रक्रिया सुरू नाही झाली तर बीड जिल्ह्यातील एकही कारखाना चालु देणार नाही.
-अजिंक्य चांदणे

22222222

Most Popular

error: Content is protected !!