मुंबई (रिपोर्टर)- संविधान, कायदा, विधिमंडळाचे नियम याच्याशी बेईमानी केली जात आहे. वर्षभरापासून महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार चालवले जातेय, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उल्लेख ठाकरे गट नव्हे तर शिवसेना असा करा, हीच खरी शिवसेना असल्याचा दावा देखील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आमदार अपात्रता आणि शिवसेना पक्ष चिन्हा बाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आधी, त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने त्यांची भूमिका स्पष्ट केली.