Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमकेजमध्ये राजनिवास गुटख्याची होते राजरोस विक्री

केजमध्ये राजनिवास गुटख्याची होते राजरोस विक्री

केज (रिपोर्टर)- राज्य सरकारने गुटख्यावर बंदी घातली असली तरी लपूनछपून गुटखा विक्री होत आहे. केज शहरात आता नवीनच राजनिवास नावाचा गुटखा आला असून सदरील हा गुटखा आणला कोणी? याचा छडा पोलीस प्रशासनाने घेऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
   बीड जिल्ह्यामध्ये गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून गुटखा विक्रेत्यांविरोधात ठोस कारवाई केली जात नाही. केज शहरात इतर गुटखा विक्री केला जात नसला तरी राजनिवास नावाचा गुटखा मात्र सर्रास विक्री होऊ लागला आहे. हा गुटखा आणला कोणी? याचे पाळेमुळे केज पोलीसांनी शोधून काढावेत आणि दोषींविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.

Most Popular

error: Content is protected !!