Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडइंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवा सेनेचा सायकल मोर्चा

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवा सेनेचा सायकल मोर्चा

बीड (रिपोर्टर)-पेट्रोल-डिझेल महाग झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या महागाईच्या निषेधार्थ आज युवा सेनेच्या वतीने सायकल मोर्चा काढण्यात आला होता. हा सायकल मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत काढला होता. यामध्ये जिल्हाप्रमुख सागर बहीर आदींचा सहभाग होता.
   पेट्रोल आणि डिझेल दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य वाहनधारक मेटाकुटीला आला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे इंधनाचे दर वाढत असल्याने या दरवाढीचा युवा सेनेच्या वतीने निषेध करून आज बीड शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. ही सायकल रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत काढण्यात आली होती. सदरील आंदोलन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सागर बहीर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. या वेळी किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्‍वर सातपुते, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप, राहुल साळुंके, सुरज चुंगडे, अजिंक्य पवळ, कृष्णा फरताडे, चंद्रसेन काळे, शैलेश गिरी, रवि वखरे, अक्षय काशीद, कमलेश बोरवडे, अंगद बहीर, गौरव वायभट, प्रदीप गोरे, शंभू आवटे, विकास निकम, ज्ञानेश्‍वर सातपुते, पप्पु मस्के, गणेश माने, राहुल बहीर, अखिल शेख, साहील शेख यांच्यासह आदींचा सहभाग होता.

Most Popular

error: Content is protected !!