Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडजातीसंदर्भातील आरोपांमुळे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? तक्रार दाखल केली तर सामाजिक न्यायमंत्र्यांकडून...

जातीसंदर्भातील आरोपांमुळे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? तक्रार दाखल केली तर सामाजिक न्यायमंत्र्यांकडून वानखेडेंची चौकशी करू

बीड (रिपोर्टर)- अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हं दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी वानखेडेंसंदर्भातील एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात कोणी तक्रार दाखल करुन आक्षेप घेतला तर सामाजिक न्याय मंत्रालयाच्या मार्फत वानखेडेंची चौकशी केली जाईल असं मुंडे म्हणाले आहेत. मुंडेच्या अंतर्गत येणार्‍या सामाजिक न्याय मंत्रालयाकडून यासंदर्भातील तपासाचे संकेतच या वक्तव्यातून त्यांनी दिलेत.


शनिवारी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी हे वक्तव्य केलं. समीर वानखेडे यांच्या जातप्रमाण पत्राच्या वैधतेबद्दल कोणी आक्षेप घेतला, त्यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार केली तर आम्ही या प्रकरणी चौकशी करु, असं मुंडे म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केलेत. त्यामध्येच त्यांनी समीर वानखेडे हे मुस्लीम असून त्यांनी मुस्लीम असल्याचं लपवत चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये नोकरी मिळवल्याचा आरोपही केलाय. यावरुनच मुंडे यांनी या इशारा दिलाय.
चंद्रकांत पाटलांना अशी भाषा शोभत नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीसह भाजपावर सडकून टीका केली. यावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यासारखे लोक मी खिशात ठेवतो, असं वक्तव्य केलं. याच वक्तव्यालाही मुंडे यांनी उत्तर दिलंय. चंद्रकांत पाटलांना अश भाषा शोभत नाही, असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं. ते बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. चंद्रकांत पाटलांना अशी भाषा शोभत नाही. चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत किंवा भाजपाच्या कुठल्याच राज्य किंवा केंद्रातील नेत्यांचे खिसे मोठे नाहीत. ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलायला पाहिजे, असं मुंडेंनी म्हटलं आहे.

Most Popular

error: Content is protected !!