Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeक्राईम‘त्या’ महिलेची निर्घृण हत्या अनैतिक संबंधातून सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज आणि पिशवीवरून आरोपीला...

‘त्या’ महिलेची निर्घृण हत्या अनैतिक संबंधातून सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज आणि पिशवीवरून आरोपीला घेतले ताब्यात


केज (रिपोर्टर)- केज तालुक्यातील हातगाव डोका येथे एका 40 वर्षीय विवाहित महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. मारेकर्‍यांनी महिलेचा चेहरा विद्रुप केले होता. या प्रकरणाचा तपास लावणे पोलिसांसमोर एक आव्हानच होते मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणाचा छडा लावला. सीसीटीव्ही फुटेज आणि मृतदेहाच्या बाजुला पडेल्या पिशव्या यावरून आरोपीचा शोध घेतला व आरोपीला जेरबंद केले.

Brutal murder of a 40-year-old married woman at Hatgaon Doka in kej taluka

हा खून अनैतिक संबंधातून केला असल्याचे समोर आले आहे.


मिराबाई बाबूराव रणदिवे (वय 40) या महिलेचे गेल्या काही वर्षांपूर्वी लग्न झालेले आहे. या महिलेचे सासर सांगली हे असून ही महिला हादगाव डोका येथे आपल्या माहेरी आत्याच्या वर्ष श्राद्धाला आली होती 24 नोव्हेंबर रोजी ती कपडे खरेदी करण्यासाठी केज शहरात गेली होती. मात्र ती घरी परत न आल्याने तिचा शोध घेतला असता तिचा मृतदेह एका शेतामध्ये आढळून आला. चेहरा दगडाने ठेचून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने केज तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मृतदेहाच्या बाजुला कपड्याच्या पिशव्या होत्या. त्यातून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. ज्या दुकानातून कपडे खरेदी केले त्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज यावरून तपास लावण्यास पोलिसांना मदत झाली. या महिलेसोबत कपडे खरेदी करत असताना दयानंद भीमराव गायकवाड (वय 45, रा. मस्साजोग) हा इसम असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला पोलिसांनी जेरबंद केले. या ससमाने हत्या केली असल्याचे समोर आले असून सदरील ही खुनाची घटना अनैतिक संबंधातून घडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा छडा केज पोलिस ठाण्याचे पीअय त्रिभुवन, पीएसआय काळे, पो.हे.कॉ. नामदास, पोलिस नाईक गायकवाड, पो.कॉ. शेख मतीन, गवळी यांनी लावला आहे. या प्रकरणी गायकवाड याची सखोल चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!