Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमशहरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय, चोरट्यांची पोलिसांवर दगडफेक, मध्यरात्री बालेपीरमध्ये घडली घटना,...

शहरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय, चोरट्यांची पोलिसांवर दगडफेक, मध्यरात्री बालेपीरमध्ये घडली घटना, जनावरे घेऊन जाणारा पिकअप पलटला

चोरटे फरार
बीड (रिपोर्टर)- बीड शहरात मोठ्या प्रमाणात जनावरांची संख्या आहे. रात्रीच्या दरम्यान चोरटे पिकअपद्वारे जनावरे चोरून नेत असल्याचे एका सीसी टिव्हीमध्ये कैद झाले. रात्री बालेपीर भागातील काही तरुणांनी चोरट्यांवर पाळत ठेवली. गुरे घेऊन जाणार्‍या चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी तरुणांवर दगडफेक केली. या घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांच्या दिशेनेही चोरट्यांनी दगडफेक करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. गाडी भरधाव वेगात पळून नेत असताना नगर नाक्याजवळ पिकअप पलटी झाला. गाडी पलटी झाल्यानंतर चोरटे मात्र फरार झाले. या गाडीत दोन जनावरे होती. ही गाडी कोणाची, कुठली या बाबतचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.


  बालेपीर भागामधून गेल्या काही दिवसांपुर्वी अनेक जनावरे चोरीला गेले आहेत. जनावरे चोरणारी टोळी सक्रिय असल्याचे या भागातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रात्री या चोरट्यांवर पाळत ठेवली. चोरटे एका पिकअपद्वारे जनावरे घेऊन जात असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या लोकांनी या चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांनी नागरिकांच्या दिशेने दगडफेक केली. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी या चोरट्यांचा पाठलाग केला मात्र पोलिसांच्या दिशेनेही चोरट्यांनी दगडफेक करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. गाडी पळवत असताना पिकअप नगर नाक्याजवळ पलटी झाला. यात दोन जनावरे होती. पिकअप पलटी झाल्यानंतर त्यातील चोरटे पळून गेले. गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. या गाडीत एक मोबाईल आढळून आला. या गाडीचा क्र. एच.आर. 73 ए 5651 असा आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास एपीआय गुरले, पीआय राठोड, एपीआय शेख, परझने, फेरोज पठाणसह आदी करत आहेत. दरम्यान बीड शहरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कशा पद्धतीने जनावरे चोरून नेत असल्याचे कैद झालेले आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत.

पाळेमुळे शोधा
बीड शहरातून मोठ्या प्रमाणावर जनावरांची चोरी होते, सातत्याने जनावरे चोरीस जात असताना पोलीस मात्र तक्रार नोंदवून घेत नव्हते. रात्रीचा प्रकार घडल्यानंतर हा किती गंभीर आणि लोकांना त्रासदायक प्रकार आहे हे उघड झाले. गाडी हरियाणा पासिंगची आहे. परंतु त्यामध्ये असलेले लोक कुठले? जे चोरटे आहेत ते जिल्हाबाहेरचे आहेत का? त्यांना बीडमधून कुणी मदत करतं का? त्या चोरीच्या टोळीमध्ये बीडमधील एखाद दुसर्‍या गुन्हेगाराचा संबंध आहे का याचे पाळेमुळे पोलिसांनी शोधावे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!