Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडएसपी ऑफीससमोर चार मोटारसायकल ट्रकखाली सुदैवाने जिवीत हानी नाही;चार ते पाच जण...

एसपी ऑफीससमोर चार मोटारसायकल ट्रकखाली सुदैवाने जिवीत हानी नाही;चार ते पाच जण जखमी

बीड (रिपोर्टर)- दिपावलीच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडलेले असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेल्या शेतकरी मोर्चाने शहरातील वाहतूक ठप्प होत जागोजागी ट्रॅफिक जाम झाली असतानाच जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर वाहतूक शिस्त नसल्यामुळे एका ट्रक चालकास ब्रेक न लागल्याने चार ते पाच मोटारसायकल ट्रकखाली आल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यात सुदैवाने जीवीत हानी झाली नसली तरी चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.
बार्शी नाक्याकडून आज दुपारी साडेबारा वाजता एक ट्रक जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आला असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आवक-जावक होती. शहरातल्या शिवाजी चौक परिसरात ट्रॅफिक जाम झाल्याने दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने आवक-जावक करत होते. याच स्थितीत ट्रक चालकाला ब्रेक न लागल्यामुळे एक नव्हे दोन नव्हे तीन ते चार मोटारसायकल ट्रकखाली आले. मोटार सायकलस्वार खाली पडले. सुदैवाने यात जीवीत हानी झाली नाही. मात्र चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर झाला. या वेळी उपस्थित लोकांनी ट्रक चालकाला मारहाणही केली. शहरात दिपावलीनिमित्त खरेदीसाठी मोठी गर्दी आहे. त्यात शेतकर्‍यांचा मोर्चा यामुळे सुभाष रोड, कारंजा, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झाली होती. त्यातून हा अपघात झाला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!