मास्टर, पटेल, नाईकवाडेंसह महत्वाच्या कार्यकर्त्यांनी घेतली मुंडेंच्या उपस्थितीत पवारांची भेट
बीड (रिपोर्टर): बीड शहरातल्या विविध विकास कामाप्रश्नी आज माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल, नगरसेवक अमर नाईकवाडे, मोईन मास्टर,अशफाक इनामदार यांच्यासह शहरातील महत्वाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत निवेदन सादर केले. या वेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित उपस्थित होते.
याबाबत अधिक असे की, बीड शहरातल्या शिवशारदा बिल्डिंग-मोंढा रोड ते अमरधाम स्मशानभूमी जुना मोंढा येथील सिमेंट रस्ता व दोन्ही बाजुने नाली बांधकाम, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते आनंदवाडी दोन्ही बाजुने नाला बांधकाम व दोन्ही बाजुने नाल्यापर्यंत सिमेंट रस्ता करणे, नगररोड ते पालवण चौक नाली बांधकाम, राजूरीवेस ते बलभीम चौक, माळीवेस ते बलभीम चौक ते दगडीपुल सह अन्य ठिकाणी नाली बांधकाम, सिमेंट रस्ता करण्यासह खासबाग येथे बिंदुसरा नदीवरील पुल कमी बंधार्याबाबत यासह अन्य विकास कामांबाबत आज बीड शहरातल्या महत्वाच्या लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत विकास कामांबाबतचे निवेदन सादर केचले. या वेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे, माजी आ. अमरसिंह पंडित यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार यांना भेटण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष मोईन मास्टर, अमर नाईकवाडे, फारुक पटेल, अशफाक इनामदार, प्रभाकर पोकळे, जलील खान पठाण, भैय्यासाहेब मोरे, बरकत खान पठाण, शेख सादेक, गणेश तांदळे, अक्रम बागवान, सादेक अंबानी, नसीम इनामदार, शेख शाकेर, इलीयास टेलर, रामदास सरवदे, शकील खान, संतोष क्षीरसागर, शेख रहीम, सय्यद नदीम, शेख अजीम, निलेश कवठेकर, शेख इलियास, विशाल तांदळे, अक्षय तिडके, शेख अकबर यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.