Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडआमच्या मागण्या हक्काच्या,नाही कोणाच्या बापाच्या! किसान सभेची संघर्ष दिंडी कलेक्टर कचेरीवर धडकली

आमच्या मागण्या हक्काच्या,नाही कोणाच्या बापाच्या! किसान सभेची संघर्ष दिंडी कलेक्टर कचेरीवर धडकली


दिंडीला उत्स्फुर्त प्रतिसाद; शहरातले रस्ते जाम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कलेक्टर कचेरीपर्यंतची
वाहतुक दोन तास ठप्प,पोलीसांचे नियोजन ढिसाळ,शेतकर्‍यांच्या आक्रोशाने प्रशासन हादरले

बीड (रिपोर्टर):- उद्धवस्त झालेली स्थिती, घरची आर्थिक बिकट परिस्थिती, तोंडावर आलेले सणसुद अशा स्थितीतही विमा कंपन्या 2020 सालचा भरलेला खरीप विमा देत नाहीत. राज्य सरकारही याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे संतापलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या झेंड्याखाली एकत्रित येत सिरसाळ्यापासून बीडपर्यंत गेल्या 3 दिवसापासून शेकडो किलोमीटरचा पायपीटा करत सरकार विरोधात हल्लाबोल केला. आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेली शेतकर्‍यांची पीक विमा संघर्ष दिंडी कलेक्टर कचेरीवर जावून धडकली. यावेळी शेतकर्‍यांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. प्रशासनाचे नाकार्तेपणाचे वाभाडे वेशीला टांगले. किसान सभेच्या झेंड्याखाली शेतकरी येणार नाहीत या भापित राहिलेल्या जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला मोर्चा निघाला तेंव्हा धक्का बसला. नियोजन अभाव आणि मोर्चासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते कलेक्टर कचेरीपर्यंत दोन ते अडीच तास वाहतुक ठप्प झाल्याचे यावेळी दिसून आले. शेतकर्‍यांनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्या पायाच्या फोडासह जिल्हा प्रशासनाला एका निवेदनाद्वारे दिल्या. मोर्चामध्ये उर्त्स्फुतपणे शेतकरी सहभागी झाल्याचेही दिसून आले.

kisan morcha beed 1

\
2020 साली बीड जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांनी पीक विमा भरला. मात्र विमा कंपन्यांनी कायद्यावर आणि नियमावर बोट दाखवून तुघलुकी कारभार करत शेतकर्‍यांच्या विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ केली. जिल्हाभरातील शेतकरी पीक विम्यासाठी कंपनीच्या आणि सरकारच्या दारात वेगवेगळ्या स्वरूपात मागण्या करत असतांना 2020 सालचा पीक विमा शेतकर्‍याला मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी अनेकवेळा मोर्चे आंदोलने केले. मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सिरसाळा येथून अजय बुरांडे, दत्ता डाके, मोहन जाधव, मुरलीधर नागरगोजे, पांडुरंग राठोड यांच्या नेतृत्वात सरकारविरोधात एल्गार पुकारण्यात आला आणि कलेक्टर कचेरीवर पायी मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. दोन दिवसापूर्वी सिरसाळा येथून निघोलल्या या पायी दिंडीला रस्त्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळत राहिला. अनेक शेतकरी दिंडीमध्ये सामील होत गेले. इकडे बीड जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन गाफील राहिले. शंभर पन्नास कॉम्रेड येतील अशा अभासी वृत्तीत असलेल्या जिल्हा प्रशासनाची आज सकाळी झाक उडाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होत असल्याचे पाहून पोलीस प्रशासनही खडबडून जागं झालं
आणि त्यांनी त्या गडबडीत शहरात बंदोबस्त लावला. परंतू तो अपुरा असल्याचे शहरात जागोजागी ट्रॉफिक जाम झाल्याने दिसून आले. शेतकरी आक्रमक होते. एक तर यावर्षी पावसाने शेती उद्धवस्त केली. घरातली आर्थिकस्थिती ठिक नाही, सणासुदीचे दिवस आहेत अशा परिस्थितीत विमा कंपन्या विमा देत नसल्याचे पाहून शेतकरी मोठ्या प्रमाणावर दिंडीत सहभागी झाले आणि सराकर विरोधचा आक्रोश रस्त्यावर दाखवून दिला. शासन, प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत आमच्या मागण्या हक्काच्या नाही कोणाच्या बापाच्या म्हणत शेतात घाम गाळणारा शेतकरी आज शहराच्या गर्दीत आपला घाम दाखवतांना दिसून आला. मोर्चामध्ये 5 हजारापेक्षा जास्त शेतकर्‍यांची उपस्थितीती शासन प्रशासनाला ओरडून त्यांच्यातली खदखद दाखवून देत होती. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास, रस्त्यात मिळेल ते खाणे आणि आपल्या न्याय हक्काच्या मागण्या एवढ्यावर शेतकरी आक्रमक असल्याचे दिसून आले. शेतकर्‍यांचा हा मोर्चा पाहून तरी जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाला जाग येते की नाही? 2020 शेतकर्‍यांचा हक्काचा पीक विमा त्यांना देणार की नाही? हा शेतकर्‍यांच्या वतीने रिपोर्टरचाही शासन प्रशासनाला जाहिर सवाल आहे. आज किसान सभेच्या लाल झेंड्याखाली एकवटलेला शेतकरी उद्या त्याच झेंड्याचा दांडा हातात घेईल तेंव्हा शासन आणि प्रशासन व्यवस्थेची पळताभुई थोडी होईल हा इशारा शेतकर्‍याबरोबर रिपोर्टरही व्यवस्थेला देत आहे. आजच्या मोर्चामध्ये कुठले राजकारण नाही तर न्याय, हक्काचे कारण स्पष्ट आहे याची नोंद व्यवस्थेने आता घ्यावी आणि शेतकर्‍यांना पीक विमा द्यावा.


प्रमुख मागण्या
सन 2021 च्या पीक विम्या संदर्भात 17 सप्टेंबर 2020 च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे कलम 21.5 प्रमाणे स्थानिक आपत्तीमध्ये तात्काळ पीक विमा मिळणे अपेक्षित होते परंतू अद्यापही पंचनाम्याचा गोंधळ आहे. सन 2020 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सर्व पीकांचा पीक विमा तात्काळ वाटप करण्यात यावा. दि.17 ऑगस्ट 2020 च्या केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे खरीप हंगाम 2021 च्या अतिवृष्टी बाधीत सर्व पीकांचा पीक विमा मंजूर करून वाटप करण्यात यावा. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी. शेतकर्‍यांचा ऊस शिल्लक राहणार नाही याची काळजी घेवून जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने पुर्ण क्षमतेने चालू करावेत आणि एफआरपी प्रमाणे ऊसाची रक्कम शेतकर्‍यांना देण्यात यावी.

Most Popular

error: Content is protected !!