Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडवडवणीचिंचोटीत १३ वर्षीय मुलीवर अत्याचार पोस्कोसह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

चिंचोटीत १३ वर्षीय मुलीवर अत्याचार पोस्कोसह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल


वडवणी (रिपोर्टर):- १३ वर्षीय मुलीला किराणा दुकानात बोलावून बलत्कार केल्याची घटना चिंचोटी येथे घडली असून वडवणी पोलीसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहत.तर पिडित मुलीची व कुंटुबियांची माजलगांव विभागीय पोलीस आधिकारी जयभाय यांनी भेट घेतली असून या घटनेनी तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.

वडवणी पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार,वडवणी तालुक्यातील मौजे चिंचोटी येथील गणेश संदिपान गोंडे (वय २० वर्षे) याची गावात किराणा दुकान आहे. तेथूनच काही अंतरावर असणार्‍या दलित समाजाच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला गोड बोलावून तिला चाकुचा धाक दाखवत तिच्यावर बवजबरीने बलत्कार केला. पिडित मुलीच्या चुलतीच्या फिर्यादी-वरुन आरोपी गणेश संदिपान गोंडे याच्यावर कलम ३७६ प्रमाणे अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि बाल लैंगिक अत्यचार प्रतिबंधक कायदा आणि ऍट्रॉसिटी ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अवघ्या काही तासातच वडवणी पोलीसांनी बेड्या ठोकल्या. आज सकाळी माजलगांवचे उप-विभागीय पोलीस आधिकारी जायभाये यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तर सदरील घटनेमुळे या परिसरासह तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

Most Popular

error: Content is protected !!