Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeशेतीभ्रष्ट शेळके ४२०, अडचणी वाढल्या देवी निमगाव देवस्थान जमीन प्रकरणी दोघांवर कारवाई

भ्रष्ट शेळके ४२०, अडचणी वाढल्या देवी निमगाव देवस्थान जमीन प्रकरणी दोघांवर कारवाई


बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यातील देवस्थानांच्या जमीनी सर्रासपणे भूमाफियांच्या घशात घालणार्‍या तत्कालीन उपजिल्हाधिकारी शेळके यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत असून आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील मस्जिदीची जमीन शेळकेंच्या संगनमताने राखणदाराने विक्री केल्याचे उघड झाले. या प्रकरणी वक्फ बोर्डाच्या अधिकार्‍याने अखेर अंभोरा पोलिसात तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी शेळकेंसह अन्य एका विरोधात कलम ४२० सह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत.

बीड जिल्ह्यातील देवस्थानाच्या जमीनीत मोठ्या प्रमाणात अफरातफर करण्यात आली. काही भूमाफियांनी महसूलविभागातील अधिकार्‍यांना हाताखाली धरून जमीनी स्वत:च्या नावावर करून घेतल्या. हा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे. यात काही प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत. तत्कालीन उपजिल्हाधिकारी नरहरी रामभाऊ शेळके यांच्यावरही गुन्हे दाखल झाले असून पुन्हा एका प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील मस्जिदची सर्वे नं. १३२ मध्ये १५ हेक्टर ९८ आर. जमीन आहे. खाजामियॉ मकबुल सय्यद याने सदरील जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली. त्यासाठी नरहरी शेळके याने सहकार्य करत ती जमीन त्याच्या नावावर केली. हा प्रकार वक्फ बोर्डाच्या निदर्शनास आल्यानंतर वक्फ बोर्डाचे अमिन उज्जमा यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार खाजामियॉ मकबुल सय्यद व नरहरी रामभाऊ शेळके या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा देवस्थान जमीनी प्रकरणी खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!