Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईबात निकलेगी तो फिर...; नवाब मलिकांचे आणखी एक सूचक ट्वीट

बात निकलेगी तो फिर…; नवाब मलिकांचे आणखी एक सूचक ट्वीट

आता कोणता नवा गौप्यस्फोट करणार?

कोणत्या प्रकरणावर मलिक बोलणार?

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा एक सूचक ट्वीट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक व एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. नवाब मलिक हे रोज सातत्याने या ड्रग्ज प्रकरणात नवीनवीन गौप्यस्फोट करताना दिसत आहेत. आजही नवाब मलिक यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे.

नवाब मलिक यांनी आज सकाळीच एक ट्वीट केलं आहे. बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी. लोग बेवजह उदासी का सबब पुछेंगे, असं ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे. त्यामुळं आता नवाब मलिक नवा कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसंच, आता नवाब मलिक कोणते प्रकरण बाहेर काढणार याबाबतही चर्चा रंगली आहे.

नवाब मलिकांचे वानखेडेंवर आरोप

समीर वानखेडे यांनी ‘एनसीबी’च्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी केली, तर अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येतील, असा आरोप नवाब मलिकांनी केला होता. तसंच, समीर वानखेडे ‘एनसीबी’त आल्यापासून त्यांनी स्वतःची ‘प्रायव्हेट आर्मी’ उभी करून कोट्यवधींची वसुली सुरू केली, असंही त्यांनी म्हटलं होतं.

देवेंद्र फडणवीस लक्ष्य

‘माझ्या जावयाच्या घरी गांजा सापडल्याचा फडणवीस यांचा आरोप बिनबुडाचा आहे. त्या पंचनाम्यात गांजा सापडला नसल्याचे नमूद आहे. न्यायालयानेही गांजा सापडला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या आरोपावर फडणवीस माफी मागणार आहेत काय का?’ असा सवालही मलिक यांनी केला. ‘मी गेल्या ६२ वर्षांपासून मुंबईत राहतो. माझे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे कोणीही म्हणू शकत नाही. माझे अंडरवर्ल्डशी संबंध असते, तर पाच वर्षे तुम्ही मुख्यमंत्री होते. गृह मंत्रालय तुमच्याकडे होते. मग तुम्ही पाच वर्षे शांत का बसला होता. माझ्यावर कारवाई का केली नाही.

Most Popular

error: Content is protected !!