Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडगरिबांची दिवाळी गोड करणारा ‘राजयोगी’ अडीच हजार कुटुंबियांना दिवाळीचा फराळ वाटप

गरिबांची दिवाळी गोड करणारा ‘राजयोगी’ अडीच हजार कुटुंबियांना दिवाळीचा फराळ वाटप

राजयोग आणि रोटरी क्लब बीड मिडटाऊनचे कार्य म्हणजे समाजसेवेचा
खरा सत्संग होय – ह.भ.प महादेव महाराज चाकरवाडीकर

बीड (रिपोर्टर)- अंधारलेल्या काळ्याकुट्ट खोलीला प्रकाशमान करण्यासाठी छोटयाशा पणतीची गरज असते. तिच्या प्रकाशाने अंधारलेल्या खोलीच्या भिंतीही बोलक्या होतात तसे आर्थिकदृष्ट्या अंधारलेल्या कुटुंबातील जीवंत माणसांच्या तोंडावर हास्य फुलवण्याहेतु सातत्याने पुढाकार घेणारे राजयोग फाऊंडेशन या दिवाळीतही गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी धावून आले. कोरोना असो, ईद असो, अथवा दिवाळी असो सामाजिक बांधिलकी जपत राजयोग फाऊंडेशनचे दिलीप धूत व त्यांचे पुत्र नगरसेवक शुभम धूत हे सातत्याने गोरगरिबांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवतात. या दिवाळीतही अडीच हजारापेक्षा जास्त कुटुंबियांची दिवाळी गोड करून धूत यांनी सामाजिक बांधिलकी जपली.


राजयोग फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने याही वर्षी दीपावली सणानिमित्त गोरगरिबांच्या घरात आनंदोत्सव साजरा व्हावा यासाठी सारडा कॅपिटल च्या प्रांगणात सुमारे २५०० कुटुंबीयांना दिवाळी फराळ व दिवाळी सणाचे साहित्य गुरुवार दि.३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वा. वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. महादेव महाराज यांच्यासह राजयोग फाउंडेशन चे संस्थापक दिलीप धुत, रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन चे अध्यक्ष राजेश बंब, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष सोहनी, रोटरी चे सचिव मोहम्मद आरेफ, क्रिडाई चे अध्यक्ष अतुल संघानी, सूर्यकांत महाजन, सुनील पारख, डॉ. सुरेंद्र बजाज, वैभव स्वामी, सुमंत रुईकर, शेखर महाद्वार, आत्माराम पवार, नगरसेवक शुभम धुत यांच्यासह राजयोग फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
पुढे बोलताना ह.भ.प. महादेव महाराज म्हणाले आहे त्या धनाचा सदुपयोग करतो त्याला जीवनात काही कमी पडत नाही हे कार्य संत विभुतिंच्या विचारांवर चालणारे पुण्यकर्म आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सूर्यकांत महाजन यांनी राजयोग फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन च्या या समाजहितकारक दिवाळी फराळ वाटपाच्या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. नगरसेवक शुभम धुत म्हणाले गोरगरिबांच्या दिवाळी आनंदाने साजरी व्हावी यासाठी राजयोग फाउंडेशन व रोटरी मागील ५ वर्षांपासून निस्वार्थ भावनेतून हे समाजसेवेचे कार्य सर्व सदस्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. व गतवर्षी कोरोना च्या काळात १२ आश्रमांसह, वंचित निराधार गरजवंतांच्या घरोघरी जाऊन दिवाळी फराळ व इतर साहित्य वाटप केले. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने पुढे ही अविरतपणे हे कार्य सुरू ठेवण्यात येणार आहे.
रोटरी चे अध्यक्ष राजेश बंब म्हणाले की दिवाळी हा उत्सव आनंदाची उम्मेद घेऊन येणारा आहे, गोरगरिबांच्या आयुष्यात देखील हा आनंद सर्वांसोबत यावा यासाठीच फराळ वाटपाचा हा छोटासा प्रयत्न यामाध्यमातून करण्यात येत आहे, आभार रोटरी चे सचिव मोहम्मद आरेफ यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नितीन गोपन यांनी केले.


स्मशानभूमीत ही
दिवाळी केली गोड

बीड शहरातील मोंढा रोड येथील अमरधाम व भगवाबाबा प्रतिष्ठान जवळील वैकुंठधाम स्मशानभूमीची देखभाल करणार्‍या कुटुंबांना विशेष बाब म्हणुन दिवाळी फराळ व इतर साहित्य देण्यात आले. त्या कुटुंबात देखील यामुळे दिवाळी आनंदाची झाली तसेच हत्तीखाना येथील महानुभाव पथं कृष्ण मंदिर येथील पुजारी व मंदिराची देखभाल करणार्या कुटुंबांना फराळ साहीत्याचे वाटप करण्यात आले.


दिव्यांग आणि निराधारांची ही दिवाळी झाली गोड
निराधार गरजवंतांसोबतच दिव्यांगांना दिवाळी फराळ व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले १०० पेक्षा अधिक दिव्यांगांनी याचा लाभ घेऊन आनंदाश्रूने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच जिल्ह्यातील सुमारे १३ वेगवेगळ्या वृद्धाश्रम, आश्रम, निराधार केंद्रातील आश्रय दात्यांना देखील लाभ देण्यात आला यामधे आपला परिवार-नेकनुर, सेवाश्रम-शिरुर, कामधेनु वृद्धाश्रम – कोळवाडी, ईन्फंट पाली, आदीवासी समीकरण, जिव्हाळा बेघर निवारा केंद्र, दत्तमंदिर अन्नछत्र, पसायदान सेवा प्रकल्प, आधार प्रकल्प गेवराई आदिंचा समावेश होता.

Most Popular

error: Content is protected !!