Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडसंतोष सोहनी यांनी सहारा आश्रमात केली दिवाळी साजरी ११५ मूले व मुलींना...

संतोष सोहनी यांनी सहारा आश्रमात केली दिवाळी साजरी ११५ मूले व मुलींना ड्रेस, मिठाई, फराळाचे वाटप


बीड (रिपोर्टर)- आनंदाची उमेद घेऊन येणारा दिव्यांचा दिपोत्सव दिवाळी सण, मात्र हा दिवाळीचा सण साजरा करत असतांना आपल्या बरोबर इतरांचीही दिवाळी गोड व्हावी, त्यांच्याही चेहर्‍यावर हास्य फुलावे यासाठी बीडचे उद्दोजक, वैष्णो देवी संस्थान चे संस्थापक अध्यक्ष तथा कॅट या व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी यांनी सहारा आश्रमातील मुले व मुली यांच्या समवेत आपल्या मित्रपरिवार व व्यापारी बांधवांसह दिवाळी सण साजरा करून एक फार मोठा सामाजिक संदेश दिला आहे. एवढेच नाही तर आश्रमातील ११५ मुले व मुलींना ड्रेस, मिठाई, आणि फराळाचे वाटप करून त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवीण्याचे काम केले आहे. बुधवार दि. ४ रोजी अन्न व औषध प्रशासनाचे बीड जिल्हा आयुक्त इम्रान हाश्मी गेवराई पोलीस ठाण्याचे एपीआय काळे, नगरसेवक शुभमजी धुत,कॅट व्यापारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद पिंगळे, भास्करराव गायकवाड, कुलकर्णी साहेब , स्वीट होम संघटना बीड जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा, उपाध्यक्ष जितेश पधारिया, केदार मानधने उपाध्यक्ष तालुका कॅट व्यापारी संघटना, अमोल तापडिया, भरत पटेल. अनिल तापडिया,प्रमोद निनाळ, गोविंद मुंदडा, प्रताप खरात, संजय बर्गे, कन्हैया दायमा, रफिक बागवान, सय्यद अमजद यांच्या उपस्थितीत सहारा आश्रमातील ११५ मुले व मुलींना कपडे मिठाई फटाके व फराळाचे वाटप करण्यात आले. सहारा आश्रमात दिवाळी साजरी करताना फार मनस्वी आनंद होत असून हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे यावेळी संतोष सोहनी यांनी सांगितले
गेवराई तालुक्यातील असलेल्या सहारा आश्रमात असलेले अनेक मुले व मुली यावर्षी दिवाळी सणाच्या उत्साह आनंदापासून वंचित असल्याची बाब संतोष सोहनी यांच्या कानावर पडली. यावर्षीचे दिवाळी घरात कुटुंबासोबत मित्र परिवार सोबत न करता सहारा आश्रमातील निराधार मुले व मुली यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला. नुसती दिवाळीच साजरी करायची नाहीतर त्यांना आपल्या परिवारासोबत दिवाळी साजरी केल्याचा आनंद वाटावा यासाठी संतोष सोहनी यांनी आपल्या मित्रपरिवार व व्यापारी बांधवांना सोबत घेत दि४ दिवाळीच्या सणादिवशी आश्रमातील ११५ मुला मुलींना ड्रेस, मिठाई, फटाके आणि फराळ घेऊन सकाळीच आश्रमात पोहोचले.संतोष सोहनी यांना पाहताच आश्रमातील मुला-मुलींच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद दिसला.आपल्या घरातील कोणी तरी आले की काय असे वाटू लागले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे बीड आयुक्त इमरान हाश्मी गेवराई पोलीस ठाण्याचे एपीआय काळे नगरसेवक शुभमजी धुत, यांच्या उपस्थितीत संतोष सोहनी यांनी आश्रमातील ११५ मुला-मुलींना नवीन ड्रेस मिठाई फटाके व फराळाचे वाटप केले. जणू काही आपन आपल्या कुटुंबात दिवाळी साजरी करत असल्याचा आनंद यावेळी आश्रमातील मुला-मुलींच्या चेहर्‍यावर दिसत होता. कोणिही हाक दिली की समाजातील अनेक गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे संतोष सोहनी यांनी सहारा आश्रमातील मुलामुलींची दिवाळी गोड करून एक फार मोठा सामाजिक संदेश दिला आहे. सहारा आश्रमासाठी जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा मला हक्काने आवाज द्या आश्रमातील मुला-मुलींच्या मदतीसाठी धावून येईल असे आश्वासन यावेळी संतोष सोहनी यांनी दिले. संतोष सोहनी यांनी सामाजिक भावनेतून केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.यावेळी आश्रमातील मुला मुलींसोबत संतोष सोहनी यांनी बराच वेळ संवाद साधत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

Most Popular

error: Content is protected !!