Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमपो.कॉ. संजयपांडव यांचे अल्पशा आजाराने निधन

पो.कॉ. संजयपांडव यांचे अल्पशा आजाराने निधन


बीड (रिपोर्टर)- बीड पोलीस दलात कार्यरत असणारे संजय उर्फ राजाभाऊ नारायणराव पांडव यांचे अल्पशा आजाराने दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मृत्यसमयी त्यांचे वय ५४ वर्ष होते.

बीड जिल्ह्यात एलसीबी, पेठ बीड, बीड शहर, बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून सेवा केलेले संजय पांडव हे काही दिवसांपासून आजारी होते,त्यांच्यावर हैद्राबाद, पुणे,औरंगाबाद, बीड येथे उपचार सुरू होते.गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फिनिक्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिव देहावर सायंकाळी पाच वाजता अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पांडवयांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, मुलगी, मुलगा, जावई, पुतणे, एक बहीण असा परिवार आहे .

Most Popular

error: Content is protected !!