Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडगरजू, वंचितांची दिवाळी गोड करून दिवाळी साजरी करू -ना. मुंडे

गरजू, वंचितांची दिवाळी गोड करून दिवाळी साजरी करू -ना. मुंडे


दीपावली निमित्त धनंजय मुंडे यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा

परळी (रिपोर्टर)- मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोविड विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणांना यश आले आहे. यावर्षी शेतकर्‍यांसह सर्वांचीच दिवाळी आनंदात जावी यासाठी राज्य सरकार म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न केले आहेत. आपल्या आजूबाजूच्या गोरगरीब-वंचितांची दिवाळी गोड व्हावी यासाठीही आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत असे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

दीपावली तथा लक्ष्मी पूजनाच्या पूर्व संध्येला ना. धनंजय मुंडे यांनी दीपावली निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यावर्षीची दिवाळी सर्वांच्या आयुष्यात एक नवी उमेद, नवा प्रकाश घेऊन येवो, सर्वांना आनंद, भरभराट व समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी प्रभू वैद्यनाथाकडे प्रार्थना करतो, असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
ऐन दिवाळी मध्येच आपल्यातील हजारो कुटुंबे ऊस तोडणीसाठी स्थलांतर करून आपले घर सोडून अन्यत्र जातात. त्यांच्याही आयुष्यात समृद्धी व आर्थिक उन्नती यावी यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून मी सातत्याने प्रयत्न करत आहे. साखर गोड करणार्‍या हातांची दिवाळी सुद्धा एक दिवस निश्चितच पूर्ण गोड होईल, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी आपल्या संदेशाचा माध्यमातून व्यक्त केला आहे.

Most Popular

error: Content is protected !!