Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडभरदिवाळीत एसटी कर्मचार्‍यांंचा शिमगा

भरदिवाळीत एसटी कर्मचार्‍यांंचा शिमगा


८ डेपोतून एकही गाडी हलली नाही; बाहेरून येणार्‍या वाहक-चालकांचा महिला आंदोलनकर्त्यांनी साडी-चोळीचा केला आहेर
अचानक बंदमुळे प्रवाशांची गैरसोय

बीड (रिपोर्टर)- एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी मध्यंतरी आपल्या मागण्यांसाठी बंद पुकारला होता. मात्र संघटना आणि राज्य सरकार यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा बंद परत घेण्यात आला होता. आज बीड येथील महिला कर्मचार्‍यांनी पुन्हा बंद पुकारला असून या बंदमुळे प्रवाशांची भरदिवाळीत चांगलीच तारांबळ उडाली. जिल्ह्यातील आठ डेपोमधून एकही गाडी बाहेर गेली नाही. बाहेरच्या गाड्या मात्र बीडमध्ये येतात. बाहेरच्या येणार्‍या वाहक-चालकांचा महिला कर्मचारी साडी-चोळी देऊन त्यांना आहेर करतात. या बंदमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.


एसटी कर्मचार्‍यांचं तात्काळ शासनात विलिनीकरण करण्यात यावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून केली जात आहे. या मागणीसाठी मध्यंतरी संघटनेने बंद पुकारला होता. मात्र संघटनेचे पदाधिकारी आणि सरकार यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर संघटनांनी आपला बंद मागे घेतला. आज अचानक महिला कर्मचार्‍यांनी बंद पुकारल्यामुळे बीड जिल्ह्यातील ८ एसटी डेपोतील गाड्या थांबलेल्या आहेत. बाहेरून मात्र बीडच्या डेपोत गाड्या येतात. बाहेरून येणार्‍या वाहक-चालकांचा महिला कर्मचारी साडी-चोळी देऊन आहेर करत एकप्रकारे त्यांचा निषेध करत आहेत. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांची अवस्था अत्यंत बिकट असून गेल्या वर्षभरापासून ३३ कर्मचार्‍यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या आहेत. राज्य सरकारने कर्मचार्‍यांच्या हितासाठी निर्णय घ्यावा, त्यासाठी हा बंद पुकारला असल्याचे महिला कर्मचार्‍यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. भर दिवाळीत कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या या अचानक बंदमुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

Most Popular

error: Content is protected !!