Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडएसटीच्या कर्मचार्‍यांचा संप सुरूच ,आमरण उपोषण

एसटीच्या कर्मचार्‍यांचा संप सुरूच ,आमरण उपोषण

महामंडळाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण; ए
बीड (रिपोर्टर):-एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यातील एसटी महामंडळ कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे जिल्हाभरातील सर्व एसटी बसेस बंद आहेत. महामंडळाच्या कार्यालयासमोर कर्मचार्‍यांनी आमरण उपोषण सुरू केले असून यातील एका महिला कर्मचार्‍यांची प्रकृती खालावल्याने त्यास रूग्णालयात दाखल करण्यात आले.
एसटी महामंडळाच्या प्रश्‍नाकडे राज्य सरकार सातत्याने दुर्लक्ष करत आहेत. कर्मचार्‍यांना तुटपुंजा पगार असल्याने या पगारामध्ये त्यांचा घर प्रपंच चालत नाही. गेल्या वर्षभरात 30 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांनी कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी बीड जिल्ह्यातल एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी गेल्या दोन दिवसापासून बेमुदत संप पुकारला. या संपामुळे जिल्हाभरातील सर्वच एसटी बसेस बंद आहेत. ऐन दिवाळीत कर्मचार्‍याने संप पुकारल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. कर्मचार्‍यांनी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून यातील एका महिला कर्मचार्‍यांची प्रकृती खालावल्याने त्यास उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!