Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडआष्टीनरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार,किन्ही गावात घडली घटना, आष्टी तालुक्यात दहशत

नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार,किन्ही गावात घडली घटना, आष्टी तालुक्यात दहशत


आष्टी (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात गेल्या पंधरवाड्यापासून नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला असून रोज कुठल्या ना कुठल्या गावात बिबट्या हल्ला करत असल्याचे वृद्ध येत असतानाच आज किन्ही गावातून या नरभक्षक बिबट्याने एका 9 वर्षीय मुलास उचलून नेल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. मुलाचा शोध गेत असताना अवघ्या दोन तासात सदरील मुलाचा मृतदेह ावापासून काही अंतरावर मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या नरभक्षक बिबट्याने अनेक जणांना गंभीर जखमी केले तर दोघा जणांचे जीव घेतल्याने या भागात प्रचंड भीती निर्माण झाली आहे.


आष्टी तालुक्यातील किन्ही गावात नरभक्षक बिबट्याने सार्थक संजय बनकर (रा. भापकरवाडी ता. श्रीगोंदा, वय 9) या मुलास उचलून नेल्याची घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. सदरील मुलगा हा दिवाळीनिमित्त आपल्या आजीकडे आला होता. आज सकाळी त्याचे नातेवाईक शेतात तुरीला पाणी देत असताना हा मुलगाही शेतात गेला होता. त्यावेळी अचानक बिबट्याने या मुलावर झडप घातली आणि त्याला तोंडात धरून फरफटत नेले. ही घटना माहित होताच गावातील लोकांसह वनविभागाच्या पथकाने बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता एक ते दीड तासात मुलाचा मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावर शेतात मिळून आला. नरभक्षक बिबट्याने आज पुन्हा एकाचा जीव घेतल्याने या भागात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी पंचायत समिती सदस्याचे पती यांच्यावर हल्ला करून त्यांचाही जीव घेतला होता तर काल एका महिलेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. आतापर्यंत या नरक्षभक्षकाने अनेकांवर हल्ले करून जखमी केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!