Sunday, January 23, 2022
No menu items!
HomeUncategorizedगजानन सुतगिरणीला मोठी आग, कोट्यवधींचे नुकसान

गजानन सुतगिरणीला मोठी आग, कोट्यवधींचे नुकसान

बीड (रिपोर्टर)- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या बीड-पिंपळनेर रस्त्यावर असलेल्या ईट नजीकच्या सुतगिरणीला काल पहाटे अचानक आग लागल्याने या आगीत कापूस उत्पादीत सूत, मशिनरीसह कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. आगीची माहिती कळताच घटनास्थळावर बीड, धारूर, परळी येथून अग्नि बंबांना पाचारण करण्यात आले. तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
   बीड-पिंपळनेर रस्त्यावरील ईटजवळ गजानन सुत गिरणी आहे. या सुतगिरणीतून मोठ्या प्रमाणावर सुत देशातल्या विविध कोपर्‍यात जाते. शेकडो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार्‍या या सुतगिरणीत काल पहाटे अचानक आग लागली. या आगीने उग्रस्वरुप धारण केल्याने आपल्या विळख्यात कापसासह सुत आणि मशिनरी घेतल्या. त्यामुळे सुतगिरणीमध्ये आग लागून मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती काल सकाळी सात वाजता पिंपळनेर पोलिसांना झाली. तात्काळ घटनास्थळावर पोलीस पोहचले. बीड, परळी, धारूरसह अन्य भागातून अग्निशामक दलाच्या बंबांना आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले. चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर सदरची आग आटोक्यात आली. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शी सांगण्यात येते.

Most Popular

error: Content is protected !!