Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडबीडचे भूमिपुत्र डॉ. सुधीर निकम लिखीत ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ पहिला मराठी हॉलीवूडपट

बीडचे भूमिपुत्र डॉ. सुधीर निकम लिखीत ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ पहिला मराठी हॉलीवूडपट


मराठीसह इंग्रजीत होणार शूटिंग

बीड (रिपोर्टर)
हॉलीवूडनमध्ये अनेक हाय-फाय चित्रपटांची निर्मिती करणारे यूकेमधील ‘ब्लॅक हँगर स्टुडिओ’ आणि ‘ओरवो स्टुडिओ’ आता ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमातून मराठीमध्ये पदार्पण करत आहे. ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि ‘गोल्डन रेशियो फिल्म्स’ यांच्या प्रयत्नातून हा योग जुळून आला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी तसेच इंग्रजी भाषेत चित्रित होणार आहे.

nikam
डॉ. सुधीर निकम


छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला अबाधित राखण्याचे काम त्यांच्यानंतर अनेक छत्रपतींनी केले, पण या स्वराज्य रक्षणाच्या कार्यात महत्त्वाच्या ठरतात त्या छत्रपती ताराराणी. त्या वेळेच्या जाचक पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देत मुघल, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या सत्तांविरुद्ध त्यांनी निकराचा लढा दिला. अशा या महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासात कर्तृत्व गाजवणाऱया छत्रपती ताराराणींवर आधारित हा चित्रपट पुढच्या वर्षी दिवाळीत प्रदर्शित होतोय. या चित्रपटातून छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार पोहोचणार आहे. चित्रीकरण आणि तांत्रिक बाबीदेखील लंडनमध्येच होणार आहेत. छत्रपती ताराराणींची व्यक्तिरेखा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारणार आहे. चित्रपटाची कथा-पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कदम यांचे असून दिग्दर्शन राहुल जाधव यांचे आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!