Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडदीड महिन्यापासून पांगरी अंधारात वीज कंपनीकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष

दीड महिन्यापासून पांगरी अंधारात वीज कंपनीकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष


अन्न-पाण्याविना लोकांना मारण्याचा विचार आहे की का!
गावाठाणं इतक्या दिवस अंधारात ठेवता येत नाही

बीड (रिपोर्टर)- वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार नेहमीच चव्हाट्यावर येत आहे. गेल्या दीड महिन्यापासून खापर पांगरी येथील ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाला आहे. सदरील ट्रान्सफार्मर दुरुस्त करून देण्यास वीज वितरण कंपनीने चक्क नकार दिला. दीड महिन्यापासून गाव अंधारात असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गावकर्‍यांची दिवाळी अंधारातच गेली. इतके दिवस कुठलेही गावठाण अंधारात ठेवता येत नाही तरीही वीज वितरण कंपनीने गाव अंधारात ठेवून आपला आतेताईपणा दाखवून दिला. अन्नपाण्याविना लोकांना मारण्याचा विचार आहे की काय, अशा संतप्त प्रतिक्रिया गावकर्‍यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.


दीड महिन्यापुर्वी खापर पांगरी येथील गावातील ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाला. या संदर्भात वीज वितरण कंपनीला कल्पना दिली मात्र वीज वितरण कंपनी शंभर टक्के वीज बील भरण्यावरून अडून बसली. काही नागरिकांनी बील भरण्यास सहमती दर्शवली मात्र वीज वितरण कंपनी मानायला तयार नाही. दीड महिन्यापासून गावात लाईट नसल्याने पाणीपुरवठा आणि पिठाच्या गिरण्या बंद असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बाहेरून पाणी आणण्याची वेळ गावकर्‍यांवर आली. भर दिवाळी गाव अंधारात होता. एक ते दीड महिना गावठाणं अंधारात ठेवता येत नाही मात्र तरीही वीज वितरण कंपनीने गाव अंधारात ठेवलं. लोकप्रतिनिधीही या प्रश्‍नाकडे लक्ष देत नाहीत. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष घालून संबंधित अभियंता आणि लाईनमन यांना ट्रान्सफार्मर बसवण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!