Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमनापिकीला कंटाळून शेतकर्‍याने मृत्यूला कवटाळले

नापिकीला कंटाळून शेतकर्‍याने मृत्यूला कवटाळले


नेकनूर (रिपोर्टर)- अगोदरच कर्जाचा बोजा डोक्यावर असताना महागमोलाचे बी-बियाणे खरेदी करून काळ्या आईची ओटी भरली. पीक डोलत असतानाच झालेल्या अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाल्याने कर्जाचा डोंगर कसा फेडावा या चिंतेतून एका 60 वर्षीय शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नेकनूर येथे रविवारी घडली.


सोनाजी काशीनाथ मुळे (वय 60, रा. मुळे गल्ली नेकनूर) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. या शेतकर्‍याने आज सकाळी सहाच्या सुमारास सर्वज्ञ पेट्रोल पंपाच्या पाठीमागे मोरवंडी शिवारात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती नेकनूर पोलीसांना मिळताच ठाणेप्रमुख शेख मुस्तफा, खांडेकर, पवार, राऊत यांनी भेट देऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात पाठवला. मुळे यांच्या पश्‍चात दोन मुली, एक मुलगी असा परिवार आहे.

Most Popular

error: Content is protected !!