Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमट्रक-दुचाकीच्या अपघातात तरूण ठार

ट्रक-दुचाकीच्या अपघातात तरूण ठार


गेवराई (रिपोर्टर):- ट्रक-दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कॅप्टन पेट्रोल पंपाजवळ घडली.

संतोष रामकिसन नन्नवरे (वय 35) रा.जवाहरवाडी ता.गेवराई असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शनिवारी रात्री संतोष नन्नवरे यांनी जय भवानी सहकारी साखर कारखान्यावर ट्रॅक्टर लावून ते दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात असतांना कॅप्टन पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीचा आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात ते जागीच ठार झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!