Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमचिंचगव्हाण येथे अल्पवयीन मुलीची छेडछाड, आईसह शिक्षकावर गुन्हा दाखल

चिंचगव्हाण येथे अल्पवयीन मुलीची छेडछाड, आईसह शिक्षकावर गुन्हा दाखल

माजलगाव
तालुक्यातील चिंचगव्हान येथे अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी तिच्या आईसह शिक्षक महादेव राठोड रा.बाबी तांडा यांच्या विरुद्ध पोस्को अंतर्गत माजलगाव शहर पोलिसात रविवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , माजलगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिंचगव्हाण येथे आई-वडिलांसह 17 वर्षीय मुलगी राहत असे. घरी आई वडील नाहीत हे पाहून दिनांक 5 आँक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दारूच्या नसेत घरी येऊन वाईट उद्देशाने फिर्यादीचा हात धरून बेडवर पाडण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने यावेळी आरडा ओरड केल्यानंतर त्याने तीला सोडले
. त्यानंतर आरोपीने मुलीस धमकी दिली की , तू एकटी भेटशील तेव्हा तुला दाखवतो या भीतीपोटी सदर मुलगी उपळी येथे तिच्या आत्याकडे गेली. सदरील शिक्षकास तिची आई सहकार्य करत होती व मुलीस शिक्षकाला बोलत जा असे म्हणत होती.
तिची भिती कमी झाल्यानंतर तीने मामाला झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने मामा सोबत घेऊन शहर पोलिसात बाललैंगिक अत्याचार अंतर्गत शहर पोलिसात शिक्षक व आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खुळे या करत आहेत.
दरम्यान आरोपी हा शहरातील एका नामांकित शाळेतील शिक्षक असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!