Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडधारूरभोगलवाडी सज्जाला दोन महिन्यापासून तलाठी मिळेना

भोगलवाडी सज्जाला दोन महिन्यापासून तलाठी मिळेना

तलाठी देता का कुणी तलाठी शेतकर्‍यांची ओरड
जिल्हाधिकारी साहेब जरा धारूर तहसीलच्या कारभाराकडे बघाच

किल्ले धारूर( रिपोर्टर) धारुर तालुक्यातील भोगलवाडी व काटेवाडी या गावांना तलाठीच नसल्याने येथील शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत शासनाने तसेच बीड जिल्हाधिकार्‍यांनी दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना अनुदान वितरित व्हावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली परंतु धारूर तहसील कार्यालयाचा कारभार नेहमीच रामभरोसे राहिलेला आहे.

भोगलवाडी व काटेवाडी या गावांना तलाठीच नसल्याने शेतकर्‍यांची दिवाळी अनुदान विना अंधारातच गेली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब जरा धारूर तहसील कार्यालयाच्या कारभाराकडे बघाच असे शेतकरी ओरडून सांगत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून भोगलवाडी, काटेवाडी या गावांना तलाठी नसल्याने शेतकर्‍यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे कोणत्याही तलाठ्याने येथील चार्ज घेतला नसल्याने याद्या बनवायच्या कुणी असा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता यामुळे शेतकर्‍यांच्या हातात दिवाळीपूर्वी अनुदान आलेच नाही तसेच त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे येथील तलाठी सज्जाला तलाठी देण्याची मागणी वारंवार शेतकरी करत आहेत तरी देखील धारूर तहसील कार्यालयाने कोणत्याही तलाठ्याची नेमणूक केलेली नाही त्यामुळे आता तलाठी कधी येणार याद्या कधी तयार होणार आणि शेतकर्‍यांच्या हातात ती अनुदान कधी पडणार हे मात्र देवच जाणे परंतु यातून धारूर तहसील कार्यालयाचा कारभार कशा रीतीने चालत असेल हे यातुन समजून येत आहे. गोरे नामक तलाठी यांना भोगलवाडी सज्जाची ऑर्डर दिली आहे ते कारभार घेतील त्यांना याबाबत सांगितले असून ते भोगलवाडी सज्जाचा कारभार घेणार असल्याचे तहसीलदार सौ वंदना शेडोळकर यांनी सांगितले आहे.परंतु त्यांनी ऑर्डर घेतली यांनी ऑर्डर घेतली असे आम्ही खूप दिवसापासून ऐकत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे परंतु प्रत्यक्षात एकही तलाठी सज्जावर येत नसल्याचे शेतकर्‍यांची ओरड कायम आहे .

Most Popular

error: Content is protected !!