दिंद्रुड (रिपोर्टर): गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिंद्रुड पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिंद्रुड पोलीस स्टेशन हद्दीतील पाच गावांमध्ये अवैद्य दारू विक्रीवर धाड टाकून कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिंद्रुड पोलीस स्टेशन हद्दीत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिंद्रुड पोलीस क्शन मोडमध्ये आले असून त्यांनी दिंद्रुड पोलीस स्टेशन हद्दीतील दिंद्रुड येथे पो.को. युवराज श्रीडोळे यांनी धाड टाकून रामेश्वर मारुती काळे याच्या कडून देशी टँगो पंच च्या 35 बाटल्या तर कोथिंबीर वाडी येथील चंद्रसेन दशरथ वैराट याच्याकडून 800 रु किमतीची देशी दारू,भोगलवाडी फाटा येथील सुरेश श्रीमंत इंगोले रा.कारी याच्याकडून 770 रु किमतीची देशी दारू दिंद्रुड पोलीस स्टेशनचे पिएसआय ज्ञानेश्वर राडकर यांनी धाड टाकून जप्त केली तर मोगरा येथील सत्यभामा आश्रुबा गायकवाड हिच्याकडून पो.कॉ. रेवन दुधाने यांनी 1200 रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त केली तसेच नित्रुड येथील आप्पा आश्रुबा गोरे यांच्याकडून 700 रुपये किमतीची देशी दारू पो.कॉ. अनिल भालेराव व पो. कॉ.बालाजी सूरेवाड यांनी धाड टाकून जप्त केली.या सर्व व्यक्ती विरोधात दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये अवैद्य दार विक्री कलम 65 इ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.