Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडधनंजय मुंडे शनिवारी आष्टीच्या दौऱ्यावर

धनंजय मुंडे शनिवारी आष्टीच्या दौऱ्यावर

बिबट्याच्या हल्ल्यात पीडित दोन्ही कुटुंबांची घेणार भेट; वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी करणार पाहणी

बीड (दि. २७) —- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे शनिवारी (दि. २८) आष्टी तालुक्याचा दौरा करणार आहेत. ना. मुंडे तालुक्यात दोन ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दोन्हीही पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.

आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील नागनाथ गर्जे या शेतकऱ्याचा चार दिवसांपूर्वी तर अन्य घटनेत किन्ही येथील एका नऊ वर्षांच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या दोनही पीडित कुटुंबांची ना. मुंडे भेट घेणार आहेत. तसेच या भागात दहशत पसरवलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

धनंजय मुंडे हे सकाळी दहा वाजल्यापासून आ. बाळासाहेब आजबे यांच्यासमवेत आष्टी तालुक्याचा दौरा करणार आहेत.

ना. मुंडे यांनी वनमंत्री ना. संजय राठोड यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क करून या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी प्रभावी यंत्रणा तातडीने राबवावी, तसेच या भागात पथकांची व नियंत्रण उपकरणांची संख्या वाढवावी याबाबत चर्चा केली असून, या तयारीचा ते प्रत्यक्ष भेट घेऊन आढावा घेणार आहेत.

दुपारी आष्टीतील पदवीधर मेळाव्यास उपस्थिती

दरम्यान सुरुडी किन्ही येथील भेटीनंतर आष्टी येथील साईदत्त मंगल कार्यालय येथे दुपारी १२ वा. आयोजित पदवीधर मेळाव्यासही धनंजय मुंडे संबोधित करणार आहेत. या मेळाव्यास आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे मान्यवर नेते, पदाधिकारी यांसह या भागातील शिक्षक – पदवीधर बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आ. बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!