Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमहाराष्ट्र क्रिकेट संघात सोनवणे, तर सचिनची अंडर १९ संघात निवड

महाराष्ट्र क्रिकेट संघात सोनवणे, तर सचिनची अंडर १९ संघात निवड


बीड (रिपोर्टर)- बीड येथील जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडुंची महाराष्ट्र क्रिकेट संघ व अंडर १९ इंडिया डी संघामध्ये निवड झाली आहे. या निवडीबद्दल सदरील खेळाडुंचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ऋषिकेश सोनवणे याची सी.के. नायडू (यू २५) महाराष्ट्र संघात निवड झाली आहे तर सचिन धस याची चॅलेंजर ट्रॉफी अंडर १९ इंडिया डी संघात कर्णधार म्हरूएन निवड झाली आहे. बीड जिल्ह्यातील यात बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पारदर्शी कामाचा मोलाचा वाटा आहे. बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, सचिव आमेर सलीम, महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, शुभम धूत, खान जैतुल्ला, जावेद पाशा, रिजवान खान, शेख अझहर, सुनील गोपी शेट्टी, गोपाल गुरखुदे, आरिफ शेख, अतिक कुरेशी, अक्षय नरवडे, पठाण शाहरूक, सरफराज मोमीन व अम्मार सलीम यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Most Popular

error: Content is protected !!