Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईममोटारसायकल-कारची धडक, दोन ठार केज-कळंब रोडवरील घटना

मोटारसायकल-कारची धडक, दोन ठार केज-कळंब रोडवरील घटना


बहिणीसमोर भावाचा दुर्दैवी मृत्यू

अपघात भीषण, कार आधी कठड्याला धडकली, नंतर मोटारसायकलवर आदळली, तीन-चार पलट्या खाल्ल्या, कार चालकाचाही मृत्यू

केज (रिपोर्टर)- दिवाळी निमित्त केज येथे माहेरी आलेल्या बाहिनीसह भाच्यास तिच्या सासरी घेऊन मोटारसायकलवर निघालेल्या भावाच्या गाडीला समोरून भरधाव वेगात येणार्‍या कारणे जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलस्वारांसह कार चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास केज-कळंब रोडवरील तेलंगे यांच्या शेताजवळच्या पुलाजवळ घडली. या अपघातातील कार चालक हा नवशिक्या असल्याचे सांगण्यात येते तो सकाळी कार चालवत होता कार भरधाव असल्याने त्याचा कारवरील ताबा सुटला आणि त्याची कार पुलाला धडकून मोटारसायकलला धडकडेत अनेक पलट्या खात रस्त्यावर आडवी झाली. कारची अवस्था पाहून हा अपघात किती भीषण होता हे लक्षात येते. या अपघातात एक महिलेसह लहानमुलगा जखमी झाला आहे.


याबाबत अधिक असे की, केज येथील अमोल सत्वधर हा तरुण दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या आपल्या बहिणीला सासरी सोडण्यासाठी निघाला. एसटी कर्मचार्‍यांचा संप असल्याने जिल्ह्यातील बससेवा बंद आहेत. त्यामुळे अमोलने आपली बहिणी अनुराधा विनोद फुलसुंदर व भाच्चा आदित्य विनोद फुलसुंदर या दोघांना मोटारसायकल (क्र. एम.एच. ४४ वाय. २१५३) या गाडीवरून तिच्या सासरी निघाला असता त्याची मोटारसायकल केज-कळंब रोडवरील साळेगाव नजीक तेलंगे यांच्या शेताजवळील पुलाजवळ आली. त्याच वेळी समोरून भरधाव वेगात कार (क्र. एम.एच. २५ ए.एस. ७५९०) ही येत होती. सदरील कारच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ती गाडी पुलाला धडकून अमोलच्या मोटारसायकलला धडकली अन् तिने काही पलट्या खाल्ल्या. या भीषण अपघातात मोटारसायकलवरील अमोल सत्वधर आणि कारचालक अमित जीवन बाराते (वय २२, रा. कळंब) हे दोघे जागीच ठार झाले. कार चालवणारा अमित हा नवशिखा होता. तो सकाळी कार शिकण्यासाठी या रस्त्यावर आला होता. अपघात पाहिल्यानंतर त्याची भयानकता समोर येते. अमितची कार भरधाव होती, त्याने आधी पुलाच्या कठड्याला धडक दिली असावी त्यानंतर त्याची मोटारसायकलला धडक बसली. या अपघातात अनुराधा विनोद फुलसुंदर व त्यांचा मुलगा आदित्य विनोद फुलसुंदर हे जखमी झाले. जखमींना तात्काळ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर केजचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, संतोष मिसळे, पाचपिंडे, गवळी, गायकवाड, शिनगारे, सानप, शेख, गिते, हनुमंत गायकवाड हे सर्व पोलीस कर्मचारी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिका चालक घुले व ग्रामस्थांनी मदत केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!