Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडसोन्याच्या दुकानातून 14 ग्रॅमच्या मोरण्या लंपास

सोन्याच्या दुकानातून 14 ग्रॅमच्या मोरण्या लंपास


गेवराई (रिपोर्टर)- सोन्याच्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेने हातचलाखी करून 68 हजार रुपये किंमत असलेल्या सोन्याच्या 14 ग्रॅम 200 मि.ली. वजनाच्या मोरण्या चोरून नेल्याची घटना गेवराई शहरातील बेदरे ज्वेलर्स येथे घडली होती. या प्रकरणी गेवराई पोलिसात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


शहरातील शास्त्री चौक येथील बेदरे ज्वेलर्समध्ये सोने खरेदीसाठी एक तोंड झाकलेल्या महिला आली होती. तिने हातचलाखी करून दुकानातील 14 ग्रॅम 200 मि.लि. वजनाच्या मोरण्या लंपास केल्याची घटना 4 नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी दुकानाचे मालक ओमप्रकाश बेदरे यांनी काल सीसीटीव्ही तपासून गेवराई पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अनोळखी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Most Popular

error: Content is protected !!