Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमदाम्पत्यास लुटणार्‍या आरोपीला पोलीसांनी केले जेरबंद, चौसाळ्याजवळ घडली होती घटना

दाम्पत्यास लुटणार्‍या आरोपीला पोलीसांनी केले जेरबंद, चौसाळ्याजवळ घडली होती घटना


नेकनूर (रिपोर्टर):- अक्कलकोटवरून बीडकडे येणार्‍या एका दांम्पत्यास चोरट्याने चौसाळ्याजवळ लुटून त्यांच्याकडील सोन्या-चांदीसह इतर ऐवज लुटला होती. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी या प्रकरणाचा छडा लावला. यातील एका आरोपीला कळंब तालुक्यातल्या मोहा येथून ताब्यात घेतले आहे.


नम्रता धनुरे ही महिला आपल्या पतीसमवेत अक्कलकोटवरून बीडकडे मोटर सायकलवर येत होती. चौसाळ्याजवळ चोरट्याने त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना धमकावून त्यांच्या जवळील सोन्याच्या दागिन्यासह इतर रक्कम लुटली होती. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा छडा पोलीस प्रशासनाने लावला आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख, विलास जाधव, दिपक खांडेकर, प्रशांत क्षीरसागर, राठोड ढाकणे, अनवणे, कांबळे यांनी कळंब तालुक्यातल्या मोहा येथील शहाजी काळे नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले. सदरील या आरोपीने या दांम्पत्यास लुटले असल्याचे सांगण्यात आले. त्यात अन्य काही आरोपी असल्याचे सांगण्यात येते.

Most Popular

error: Content is protected !!