बीड (रिपोर्टर)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदालेन करण्यात आले. जिल्हाभरातील प्रत्येक ग्रा.पं. आणि तहसील कार्यालयासमोर देखील आंदोलन करण्यात आले आहे.
काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने सुरू आहेत. मनोज जरांगे हे राज्याच्या दौर्यावर आहेत. त्यांना समर्तन देण्यासाठी आज गांधी जयंतीच्या दिवशी जिल्हाभरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक तहसील आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर आजचे हे आंदोलन झाले.