घोषणांनी मैंदा परिसर दणाणला
बीड (रिपोर्टर)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बीड जिल्ह्यासह मराठवाडा विभागात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने होत आहेत.
आज बीड तालुक्यातील मैंदा येथील पाणी पुरवठ्याच्या टाकीवर शोलेस्टाईल आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या तरुणांनी टाकीवरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू आहे. बीड जिल्ह्यातही दररोज कुठे ना कुठे आंदोलन करण्यात येत आहे. मैंदा येथे शोलेस्टाईल आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या काही तरुणांनी पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून आंदोलनकर्त्यांनी मराठा आरक्षणासाठी मागणी लावून धरली.