बीड (रिपोर्टर)- राज्य सरकार खासगीकरण मोठ्या प्रमाणात करत असून हे खासगीकरण थांबविण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयवार आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. या मोर्चात अनेकांचा सहभाग होता.
राज्य सरकार कंत्राटीकरण, खासगीकरण मोठ्या जोमाने करत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे, शासनाने खासगीकरण करणे बंद करावे यासाठी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. हा मोर्चा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून काढण्यात आला होता सदरील मोर्चा डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता. या वेळी राहुल कदम, प्रशांत ओव्हाळ, सनी गायसमुद्रे, सुरज खळगे, कपील शिंदे, रमेश थोरात, विकास ओव्हाळ, हिराचंद काळे, अच्यूत चक्रे यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.