Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडबांधकाम कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बांधकाम कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन


बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी येणार्‍यांचे अडचणी सोडवण्यासाठी बैठक बोलावून प्रश्‍न मार्गी लावण्यात यावा, या मागणीसाठी असंघटीत मजदूर पंचायतच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.


जिल्ह्यातील ग्रामसेवक शासन आदेश असताना खर्‍या बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देत नाहीत व बीडीओकडे पाठवतात. काही ठिकाणी बीडीओ काम कल्याणचे प्रमाणपत्र देतात. मात्र असे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार बीडीओंना नसल्याने नोंदणी नाकारल्या जातात. यासह इतर प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पुढाकार घ्यावा या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू असून या वेळी राजकुमार घायाळ, पठाण शेरजमा खान यांच्यासह आदींची उपस्थिती आहे.

Most Popular

error: Content is protected !!