Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडबालाजी अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये चोरी पाऊण लाखाचा मुद्देमाल लंपास

बालाजी अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये चोरी पाऊण लाखाचा मुद्देमाल लंपास


धारूर (रिपोर्टर)- शहरातील आडस रोडवर असलेल्या बालाजी अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करत गल्ल्यातील 41 हजार व एक गंठण आणि डीव्हीआर असा एकूण 74 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना काल रात्री घडली. या प्रकरणी धारूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडस रोडवर असलेल्या बालाजी अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याचा कोंडा तोडून कपाटाचे लॉक उघडून आतमध्ये ठेवलेले नगदी 41 हजार 500 रुपयेे, सोन्याचे गंठण व एक डीव्हीआर चोरून नेला. या प्रकरणी बालाजी आत्माराम चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून धारूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!