Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडधारूरएसटी कर्मचार्‍यांचा कुटुंबासह धारूर तहसिल कार्यालयावर विराट मोर्चा

एसटी कर्मचार्‍यांचा कुटुंबासह धारूर तहसिल कार्यालयावर विराट मोर्चा


किल्ले धारूर (रिपोर्टर )-धारूर आगारातील एसटी कर्मचार्‍यांचे गेल्या पाच-सहा दिवसांपासून संप सुरू आहे आज या संपाचे रूपांतर विराट मोर्चामध्ये झाल्याचे दिसून आले सर्व संपकरी कर्मचार्‍यांनी आपल्या कुटुंबीयांसह धारूर शहरातून विराट मोर्चा काढला यावेळी एसटी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देण्यात आल्या या घोषणांनी धारूर शहर पूर्णतः दुमदुमले होते.

धारुर शहरातून आज एसटी कर्मचार्‍यांनी एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी मोठा विराट मोर्चा आपल्या कुटुंबियांसह शहरातील शिवाजी चौकातून काढला आमच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता धारूर आगारातील पाच कर्मचार्‍यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत आम्ही महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनिकरण झाल्याशिवाय थांबणार नाहीत हा लढा सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे अत्यल्प पगारामध्ये कर्मचार्‍यांना आपले कर्तव्य बजावावे लागत असलेल्या लागत आहे तसेच एसटीचे कुठलेही नुकसान झाले तर ते कर्मचार्‍यांच्या खिशातून भरावे लागत असल्याने कर्मचार्‍यांमध्ये मोठा रोग पसरला आहे नाराजी पसरलेली आहे अगोदरच तुटपुंजा पगार आणि त्यामध्ये झालेली तोडमोड देखील पगारातून द्यावी द्यावी लागते इतर विभागाचे तुलना करता एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांना अत्यल्प पगार आहे यामुळे महामंडळाची शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी हा विराट मोर्चा काढण्यात आला होता. आजच्या विराटचा मधे धारूर आगारातील कर्मचारी तसेच कुटुंबीय शेकडोच्या संख्येने उपस्थित झाले होते अनेक सामाजिक संस्था यांनी देखील या संपाला पाठिंबा दिला आहे तहसील कार्यालयामध्ये मनोगत व्यक्त करून सर्व संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

Most Popular

error: Content is protected !!