Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडइंधनावरचा व्हॅट कर कमी करा

इंधनावरचा व्हॅट कर कमी करा

आ. धसांचे आष्टी तहसीलसमोर निदर्शने


आष्टी (रिपोर्टर)- देशात इंधनाचे दर भरमसाठ वाढल्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलची दरवाढ काही प्रमाणात कमी केली. मात्र पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट करात कपात अद्यापपर्यंत राज्य सरकारने केली नाही. याच्या निषेधार्थ आ. सुरेश धस यांनी आष्टी तहसीलवर निदर्शने करत राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल करात कपात करावी, अशी मागणी केली.


पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी पार केल्यानंतर देशात महागाई भरमसाठ वाढली. सर्वसामान्य जनतेला इंधन दरवाढीने मेटाकुटीला आणून सोडले. गेल्या आठवडाभरापुर्वी केेंद्र सरकारने डिझेलवर दहा रुपये आणि पेट्रोलवर पाच रुपये कपात केली. भाजप शासित अन्य राज्यांनीही व्हॅट करात कपात करून दिलासा दिला. मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने व्हॅट करात अद्याप कपात केली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड आर्थिक झळ सोसावी लागत आहे. राज्यातल महाविकास आघाडी सरकारने व्हॅट करात कपात करावी या मागणीसाठी आज भाजपा आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वात आष्टी तहसीलसमोर निदर्शने करण्यात आली. तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले. या निवेदनामध्ये आ. धसांनी राज्य सरकारने व्हॅट करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली. या वेळी आ. धसांसोबत अनेक नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!