Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडत्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ केजमध्ये मोर्चा

त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ केजमध्ये मोर्चा


केज (रिपोर्टर):- त्रिपुरा येथे गेल्या काही दिवसापासून जातीय हिंसाचार सुरू आहे. या प्रकरणातील दोषी लोकांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज केज येथे मुस्लिम समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात अनेकांची उपस्थिती होती. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना दिले.


गेल्या काही दिवसापासून त्रिपुरा येथे जातीय हिंसाचार सुरू आहे. सदरील हिंसाचारा प्रकरणी दोषी विरोधात कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. दंगेखोरा विरोधात कारवाई करण्यात यावी व या घटनेच्या निेषेधार्थ केज येथील मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा हजरत खाजा मोईजोद्दीन दर्गा या ठिकाणी काढण्यात आला होता. मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक , या मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चात शहरातील मुस्लिम समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना दिले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!